कार्यासन क्रमांक
|
थोडक्यात विषय
|
1
|
2
|
कार्यासन क्रमांक- एक
|
कला संचालकांच्या सूचनेनुसार करण्यात येणारे कामकाज.
|
कार्यासन क्रमांक- दोन (सांस्कृतिक शाखा)
|
- कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील राज्यातील सर्व शासनमान्य अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित कला संस्थांचे निरीक्षण प्रक्रियेचे कामकाज हाताळणे,
- पदविका अभ्यासक्रमाची पुनर्रचना, ऑनलाईन प्रवेश प्रवेश प्रक्रिया, शासनमान्य अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील सर्व अध्यापकीय व अध्यापकेतर पदांच्या सेवाविषयक बाबी, प्रशासकीय बाबी- उदा. आकृतीबंध तयार करणे, रिक्त पदे पदोन्नती/सरळसेवेने भरणेस मान्यता, बिंदूनामावली प्रमाणित करणे, नवीन पदनिर्मिती,सेवाविषयक धोरण व वैयक्तिक प्रकरणे जसे-सेवाखंड, सेवाज्येष्ठता, मागासवर्गीय अनुशेष इ. हाताळणे,
- योजनांतर्गत योजनांचे कामकाज हाताळणे,
- राज्यात उभारण्यात येणाऱ्या थोर पुरुषांच्या पुतळयाच्या क्ले मॉडेलला मान्यता देणे,
- दृष्यकला पदवी अभ्यासक्रम राबविणाऱ्या खाजगी विनाअनुदानित कला संस्थांचे प्रशासकीय व शैक्षणिक कामकाज हाताळणे,
- नवीन कला संस्था/नवीन पदविका व पदवी अभ्यासक्रम/तुकडी सुरु करण्यास परवानगी देणे,
- शासनमान्य अशासकीय कला संस्थांतील पदविका अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया हाताळणे,
- गैरप्रकार करणाऱ्या कला संस्थांवर दंडात्मक कारवाई करणे,
- शासनमान्य अशासकीय कला संस्थांवर प्रशासक नियुक्ती करणे,
- शासनमान्य अशासकीय कला संस्थांसंदर्भात उद्भवणारी न्यायालयीन प्रकरणे हाताळणे,
- माहिती अधिकार प्रकरणे हाताळणे,
|
कार्यासन क्रमांक- तीन (आस्थापना शाखा)
|
- खुद्द कार्यालयातील व नियंत्रणाखालील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी, प्रशासकीय बाबी- उदा. आकृतीबंध तयार करणे, रिक्त पदे पदोन्नती/ सरळसेवेने भरणे, बिंदूनामावली, नवीन पदनिर्मिती,सेवाविषयक धोरण, बदली इ. हाताळणे
- शासकीय कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक प्रकरणे जसे-सेवाखंड, सेवाज्येष्ठता, परिविक्षा कालावधी, बदली इ.,
- शासकीय कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना मंजूरी,
- अध्यापकांना द्विस्तरीय/त्रिस्तरीय वेतनश्रेणी मंजूरी,
- शासकीय कर्मचाऱ्यांना स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजूरी,
- अनुकंपा नियुक्त्या करणे,
- वारसाहक्क नियुक्त्या करणे,
- मागासवर्गीय अनुशेष भरतीबाबतची प्रक्रिया करणे,
- शासकीय कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशी प्रकरणे हाताळणे,
- शासकीय कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 50/55 वर्षी पुनर्विलोकन करणे,
- अतिरिक्त कार्यभाराची प्रकरणे हाताळणे,
- वैद्यकीय देयके मंजूरी, सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी अग्रिमे(परतावा/ना-परतावा), उत्सव अग्रिम, घरबांधणी अग्रिम,संगणक अग्रिम, वाहन अग्रिम मंजूरी, रजा मंजूरी, वर्तमानपत्र देयके मंजूरी इ. प्रकरणे हाताळणे,
- गोपनीय अहवालांचे संस्करण करणे,
- माहिती अधिकार प्रकरणे हाताळणे,
- विद्यार्थ्यांसाठीच्या विविध शिष्यवृत्त्यांची प्रकरणे हाताळणे,
- व्यावसायिक कलाकार व विद्यार्थ्यांसाठी राज्य कला प्रदर्शने आयोजित करणे,
- कै.वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कारासाठी शासनास शिफारस करणे इ.
|
कार्यासन क्रमांक-चार (म.रा.कला शिक्षण मंडळ)
|
- मंडळाचे आवक-जावक हाताळणे.
- कला शिक्षण मंडळ व नियामक परिषदेच्या बैठकांच्या अनुषंगाने सर्व आवश्यक ती कार्यवाही करणे.
- मंडळातील अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबी हाताळणे.
- मंडळाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
- मंडळातील अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतन विषयक बाबी हाताळणे.
- मंडळातील अधिकारी/कर्मचारी यांचे सेवापुस्तके हाताळणे/अद्ययावत ठेवणे.
- मंडळाच्या वित्त विषयक बाबी हाताळणे.
- शासकीय रेखाकला परीक्षा, शासकीय उच्चकला परीक्षा, बालचित्रकला परीक्षा, संगीत अभ्यासक्रमांच्या परीक्षा या परीक्षांच्या आयोजनाच्या अनुषंगाने अनुज्ञेय असणारी देयके अदा करणे.
- मंडळाचे अंदाजपत्रक तयार करणे.
- मंडळ, नियामक परिषद तसेच मंडळाच्या विविध समित्यांच्या बैठकांना उपस्थित असलेल्या सदस्यांची अनुज्ञेय असणारी देयके अदा करणे.
- शासकीय रेखाकला परीक्षा, शासकीय उच्चकला परीक्षा, बालचित्रकला परीक्षा, संगीत अभ्यासक्रमांच्या परीक्षा या परीक्षांकरिता नियुक्त करण्यात येणारे पेपर सेटर, प्रुफ रिडर, भाषांतरकार, परीक्षक, समालोचक, उपमुख्य समालोचक यांची मानधन देयके तसेच प्रवास भत्त्याची देयके अदा करणे.
- शासकीय रेखाकला परीक्षा, शासकीय उच्चकला परीक्षा, बालचित्रकला परीक्षा, संगीत अभ्यासक्रमांच्या परीक्षा या परीक्षांच्या केंद्र खर्चाची देयके अदा करणे.
- अनुदानित कला परिसंस्थांतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतन विषयक बाबी हाताळणे.
- अशासकीय अनुदानित कला परिसंस्थांना देण्यात येणारे सहायक अनुदान विषयक बाबी हाताळणे.
- अशासकीय अनुदानित कला परिसंस्थांचे अंदाजपत्रक तयार करणे.
- शासकीय रेखाकला परीक्षा, शासकीय उच्चकला परीक्षा, बालचित्रकला परीक्षा व संगीत अभ्यासक्रमांच्या परीक्षा या परीक्षांचे विविध परीक्षा केंद्रांवर आयोजन करणे तसेच नवीन परीक्षा केंद्रांना तपासणीअंती मान्यता देणे.
- शासकीय रेखाकला परीक्षा, शासकीय उच्चकला परीक्षा, बालचित्रकला परीक्षा व संगीत अभ्यासक्रमांच्या परीक्षा या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी पेपर सेटर, प्रुफ रिडर यांची नियुक्ती करणे तसेच उत्तरपत्रिका तपासणीकरिता मुल्यमापन केंद्रनिहाय परीक्षक, समालोचक, उपमुख्य समालोचक यांची नियुक्ती करणे.
- परीक्षांच्या अनुषंगाने परीक्षा समितीच्या बैठका वेळोवेळी आयोजित करणे.
- सर्व परीक्षांचा निकाल जाहीर करणे तसेच निकाल पडताळणी प्रकरणे हाताळणे.
- परीक्षा व निकालाच्या अनुषंगाने उद्भवणारी चौकशी प्रकरणे हाताळणे.
- शासकीय उच्चकला परीक्षांची गुणपत्रके व प्रमाणपत्रे तसेच शासकीय रेखाकला परीक्षा, बालचित्रकला परीक्षा व संगीत अभ्यासक्रमांच्या परीक्षांची प्रमाणपत्रे संबंधित कला परिसंस्थांना/शाळांना वितरीत करण्याबाबतची सर्व कार्यवाही करणे.
- प्राप्त अर्जानुसार दुय्यम गुणपत्रक व प्रमाणपत्रे निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही करणे.
- गुणपत्रक व प्रमाणपत्रांवरील नावात दुरुस्ती करण्याबाबतची प्रकरणे हाताळणे.
- गुणपत्रक/प्रमाणपत्र पडताळणीबाबतची कार्यवाही करणे.
- परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके/बक्षीसे देण्याबाबतची सर्व कार्यवाही करणे.
- मंडळासाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री-यंत्रसामुग्री खरेदी प्रक्रीया राबविणे.
- मंडळासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
- परीक्षांच्या गुणपत्रिका, प्रमाणपत्र, उत्तरपत्रिका व इतर आवश्यक नमुने छपाई करण्याच्या अनुषंगाने खरेदी प्रक्रीया राबविणे.
- मंडळासाठी आवश्यक त्या निविदा प्रक्रीया राबविणे.
- जडवस्तु संग्रह नोंदवही अद्ययावत ठेवणे.
- दरवर्षी आवश्यक असणाऱ्या निधीचे अंदाजपत्रक विहित वेळेत लेखा शाखेस सादर करणे.
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार उच्चकला पदविका/प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करणे व नवीन अभ्यासक्रमास मंडळाची मान्यता घेणे.
- शासकीय रेखाकला परीक्षा, बालचित्रकला स्पर्धा यांचा अभ्यासक्रम तयार करुन त्यास मंडळाची मान्यता घेणे.
- दिर्घ व अल्प कालावधीचे व्यवसायाभिमुख व काळानुरुप नवनवीन अभ्यासक्रम तयार करुन त्यास मंडळाची मान्यता घेणे.
- नवीन अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीकरिता अध्यापकांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे.
- अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित कला परिसंस्थांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
- कला परिसंस्थांना मंडळाची संलग्नता देण्यासंदर्भातील प्रकरणे हाताळणे.
- दरवर्षी कला परिसंस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश तपासणी करुन प्रवेश निश्चित करणे.
- अशासकीय कला परिसंस्थांची शैक्षणिक तपासणी करणे.
- विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणासाठी ना-हरकत प्रमाणपत्र, मायग्रेशन, ट्रांसक्रिप्ट इ. निर्गमित करणे.
- नवीन कला परिसंस्थांना मान्यता देण्यापूर्वी संबंधित संस्थेची तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल सादर करणे.
- अनुदानित व विनाअनुदानित परिसंस्थांच्या सेवाविषयक बाबींची तपासणी करणे,
- अनुदानित व विनाअनुदानित कला परिसंस्थांच्या वित्तीय बाबींची तपासणी करणे,
- अनुदानित व विनाअनुदानित कला परिसंस्थांच्या शैक्षणिक बाबींची तपासणी करणे,
- अनुदानित कला संस्थांचे वार्षिक लेखा परिक्षण करणे,
- नवीन संस्थांना मान्यता देण्यासंदर्भातील प्रस्तावांची तपासणी करणे,
- अनुदानित कला परिसंस्थांची भविष्य निर्वाह निधी प्रकरणे मंजूर करणे,
- अनुदानित कला परिसंस्थांची सेवानिवृत्तीवेतन प्रकरणे तपासून सादर करणे,
- 31 अनुदानित कला परिसंस्थांना वेतन व वेतनेतर अनुदानाचे वितरण करणे,
- अनुदानित परिसंस्थांची वेतन देयके मंजूर करणे.
- उच्चकला पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश निश्चिती करणे,
- मुंबई विभागाच्या अनुदानित कला परिसंस्थांची वेतन देयके सादर करणे.
|
कार्यासन क्रमांक- पाच (लेखा शाखा)
|
- खुद्द कार्यालय व नियंत्रणाखालील शासकीय कार्यालयांचे वेतन व वेतनेतर खर्चाचे वार्षिक अंदाज, आठमाही सुधारित अंदाज शासनास सादर करणे,
- अशासकीय अनुदानित कला संस्थांचे सहायक अनुदानाचे वार्षिक व आठमाही अंदाज शासनास सादर करणे,
- शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीवेतन प्रकरणे हाताळणे,
- शासनमान्य अशासकीय अनुदानित कला संस्थेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीवेतन प्रकरणे हाताळणे,
- शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चिती प्रकरणे हाताळणे,
- शासनमान्य अशासकीय अनुदानित कला संस्थेतील कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चिती प्रकरणे हाताळणे,
- शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन देयके, सेवा-नि-उपदान देयके,रजा रोखीकरण देयके, वैद्यकीय देयके, सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी अग्रिमे(परतावा/ना-परतावा) देयके, उत्सव अग्रिम देयके, घरबांधणी अग्रिम देयके,संगणक अग्रिम देयके, वाहन अग्रिम देयके, वर्तमानपत्र देयके,दैनिक व प्रवास भत्ता देयके,स्वग्राम रजा प्रवास सवलत देयके, योजनांतर्गत खर्चाची देयके, इंधन देयके सादर करणे व अदा करणे,
- खुद्द कार्यालय व नियंत्रणाखालील कार्यालयांचे अंतर्गत लेखा तपासणी करणे,
- अधिकारी/कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे,
- चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी लेखे ठेवणे,
- लेखा आक्षेपांचा निपटारा करणे,
|