महाराष्ट्र राज्यात दृश्य कला क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि निष्ठेने कार्य करणाऱ्या ज्येष्ठ व नामवंत कलाकारांना “वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार” सन 2019-20 पासून दरवर्षी प्रदान करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र.एडीआर-2019/प्र.क्र.94/तांशि-6, दि.02.01.2020 अन्वये शासन मान्यता देण्यात आली आहे. सदर पुरस्काराचे स्वरुप रु.5,00,000/- (अक्षरी रुपये पाच लाख फक्त), स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. सदर पुरस्कार रेखा व रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, कला व शिल्प (अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकाम, मातकाम, धातुकाम) या विभागात दरवर्षी क्रमनिहाय प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे आयोजित करण्यात येणारे कलाकार विभागाचे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उदघाटन प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतो.
“वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार” प्राप्त पुरस्कारार्थी यादी
| अ.क्र. | पुरस्कारार्थी नाव | पुरस्काराचे वर्ष | प्रदान करण्यात आलेला दिनांक व प्रदर्शन |
|---|---|---|---|
| 1. | मा. श्री. अकबर पदमसी | 2019-20 | दि.07 जानेवारी, 2020 60 वे प्रदर्शन 2019-20 |
| 2. | मा. श्री. राम सुतार | 2020-21 | दि.10 जानेवारी, 2023 62 वे प्रदर्शन, 2022-23 |
| 3. | मा.श्री. अरुण काळे | 2021-22 | दि.13 फेब्रुवारी, 2024 63 वे प्रदर्शन 2023-24 |
| 4. | मा.श्री.लक्ष्मण श्रेष्ठ | 2022-23 | दि.04 फेब्रुवारी, 2025 64 वे प्रदर्शन 2024-25 |
कलाकार विभागातील नामवंत कलाकार
महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या रौप्य महोत्सवी कला प्रदर्शनापासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ व नामवंत कलावंतांचा सत्कार करण्याची प्रथा शासनाने सुरु केलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील ज्येष्ठ व नामवंत कलाराचा सत्कार जहांगीर आर्ट गॅलरी येथे होणाऱ्या कलाकार विभागाचे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उदघाटन प्रसंगी मान्यवरांचे हस्ते रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाक्ष फक्त), शाल-श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन केला जातो.
विद्यार्थी विभागातीन नामवंत कलाकार
दृश्यकला क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांचा विकास व्हावा याकरिता महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक उपक्रम म्हणून दरवर्षी महाराष्ट्रातील कोणत्याही एका जिल्ह्यात कला संचालनालयामार्फत विद्यार्थी विभागाचे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. सदर प्रदर्शन महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते त्या जिल्ह्यातील स्थानिक एका ज्येष्ठ व नामवंत कलाकाराचा सत्कार विद्यार्थी विभागाच्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उदघाटन प्रसंगी मान्यवरांचे हस्ते रु.50,000/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त), शाल-श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन केला जातो.

