महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी व कलाकार यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या प्रतिभाशक्तीला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे याकरिता महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक उपक्रम म्हणून दरवर्षी कला संचालनालयामार्फत महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित करण्यात येते. राज्य कला प्रदर्शन महाराष्ट्राच्या कला व सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण वारसा आहे. राज्य कला प्रदर्शन कलाकार विभाग व विद्यार्थी विभाग अशा दोन विभागात खालीलप्रमाणे स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येते.
अ) कलाकार विभाग :-
कलाकार विभागाचे प्रदर्शन दरवर्षी जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे आयोजित करण्यात येते. सदर प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांच्या निवडक कलाकृतींना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि.23.01.2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार खालीलप्रमाणे पारितोषिके प्रदान करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
अ.क्र. | विभागाचे नाव | पारितोषिकांची संख्या | पारितोषिकांची (प्रत्येकी) रक्कम) | पारितोषिकांची एकूण रक्कम |
---|---|---|---|---|
1 | रेखा व रंगकला | 6 | रु.50,000/- | रु.3,00,000/- |
2 | उपयोजित कला | 5 | रु.50,000/- | रु.2,50,000/- |
3 | शिल्पकला | 2 | रु.50,000/- | रु.1,00,000/- |
4 | मुद्राचित्रण | 1 | रु.50,000/- | रु.50,000/- |
5 | दिव्यांग कलाकार विभाग | 1 | रु.50,000/- | रु.50,000/- |
एकूण | 15 | रु. 7,50,000/- |
तसेच उक्त नमूद पारितोषिकांच्या दरांमध्ये दर पाच वर्षांनी 5% वाढ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सदर पारितोषिक रकमांमध्ये दर पाच वर्षांनी वाढ करण्यात येते.
आ) विद्यार्थी विभाग :-
विद्यार्थी विभागाचे प्रदर्शन दरवर्षी राज्यातील कोणत्याही एका जिल्ह्यात आयोजित करण्यात येते. सदर प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृतींना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि.23.01.2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार खालीलप्रमाणे पारितोषिके प्रदान करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
अ.क्र. | विभागाचे नाव | पारितोषिकांची संख्या | पारितोषिकांची रक्कम (रुपयांत) | पारितोषिकांची एकूण रक्कम (रुपयांत) |
---|---|---|---|---|
1 | चित्रकला व रंगकला | 4 | प्रथम- रु.10,000/- द्वितीय-रु.7,500/- तृतीय-रु.5,000/- चतुर्थ-रु.2,500/- |
रु.25,000/- |
2 | शिल्पकला | 4 | प्रथम- रु.10,000/- द्वितीय-रु.7,500/- तृतीय-रु.5,000/- चतुर्थ-रु.2,500/- |
रु.25,000/- |
3 | उपयोजित कला | 4 | प्रथम- रु.10,000/- द्वितीय-रु.7,500/- तृतीय-रु.5,000/- चतुर्थ-रु.2,500/- |
रु.25,000/- |
4 | कला शिक्षक प्रशिक्षण | 4 | प्रथम- रु.10,000/- द्वितीय-रु.7,500/- तृतीय-रु.5,000/- चतुर्थ-रु.2,500/- |
रु.25,000/- |
5 | कला व व्यवसाय | |||
(i)धातुकाम | 2 | प्रथम- रु.5,000/- द्वितीय- रु.2,500/- |
रु.7,500/- | |
(ii)मातकाम | 2 | प्रथम- रु.5,000/- द्वितीय- रु.2,500/- |
रु.7,500/- | |
(iii)गृहसजावट | 2 | प्रथम- रु.5,000/- द्वितीय- रु.2,500/- |
रु.7,500/- | |
(iv)वस्त्रकाम | 2 | प्रथम- रु.5,000/- द्वितीय- रु.2,500/- |
रु.7,500/- | |
6 | मुलभूत | 6 | प्रत्येकी रु.5,000/- | रु.30,000/- |
7 | दिव्यांग | 1 | रु.10,000/- | रु.10,000/- |
एकूण | 31 | रु.1,70,000/- |
तसेच उक्त नमूद पारितोषिकांच्या दरांमध्ये दर पाच वर्षांनी 5% वाढ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सदर पारितोषिक रकमांमध्ये दर पाच वर्षांनी वाढ करण्यात येते.